Breaking
ई-पेपरकवितानागपूरविदर्भसाहित्यगंध

माय माऊली मराठी

रजनी प्रभु फुलझेले

0 4 8 2 9 0

माय माऊली मराठी

माय माऊली मराठी
आहे विश्वात महान
थोर संत साहित्यिक
वाटे मज अभिमान | १ |

तुका, बहिणाई, साऊ
ओवी, काव्य फुलविते
गाणं चालतां बोलतां
चुली संसार मांडते |२ |

ज्ञानी जोतिबा, बा भीमा
दिला मान मराठीला
क्रांती शिवबा जिजाऊ
महाराष्ट्र घडविला |३|

साज लावणी श्रृंगार
मराठीने सजविला
गाणी, भारूड, अभंग
काळजात रुजविला |४ |

मायबोली राजभाषा
तिज कुठली ना जोड
नांदी गुण्यागोविंदाने
जाती अठरापगड |५ |

आम्ही जगतो मराठी
लाल रांगड्या मातीत
भाषा मराठी समृद्ध
शोभे माय माऊलीत | ६ |

रजनी प्रभु फुलझेले
जि.नागपूर
=========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे