0
5
7
4
5
3
गागरा
छोटा श्याम अंघोळीनंतर बोले आईला
पसर तुझा ओचा, गागरा लागेल पायाला
संस्कारांची शिदोरी देत,आई बोले श्यामला..
सांभाळतोस जशी पावले तसेच जप हो मनाला
आईच्या या वाक्याने, इवलासा पोर गोंधळला
साफ करता येईल गागरा, जर लागला तो तनुला
पण काय करायचं आई, जर लागला तो मनाला?
दुस-याचं मन दुखवेल असं वागायचंच नाही
किती छान समजावून सांगितलेस तू आई
चुकून झालेच असं तर, डोळ्यातून लागतील धारा
मनावर जमलेला गागरा मग वाहून जाईल सारा..
आईचा हा सल्ला श्यामने आयुष्यभर जपला
धुवत राहिला गागरा कायम अन्
तोही ममताहृदयी झाला..!
स्वाती मराडे-आटोळे
इंदापूर, जि.पुणे
0
5
7
4
5
3



