आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजननागपूरविदर्भसाहित्यगंध
माझी पाककला ;वाटाण्याच्या दाण्याची आमटी
मीनाक्षी काटकर
0
4
8
2
8
4
माझी पाककला
वाटाण्याच्या दाण्याची आमटी
साहित्य: एक वाटी ओले वाटाण्याचे दाणे. पाच ते सहा भाजलेल्या हिरव्या मिरच्या व लसूण पेस्ट,अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर, धने जिरेपूड, हळद, मीठ,एक मोठा चमचा तेल, कढीलिंब पाने पाच ते सहा, मोहरी, गरम पाणी तीन वाट्या इत्यादी.
कृती: दाणे कढईत भाजून मिक्सरमधून जाडसर फिरवून घ्या.कढईत तेल घाला.मोहरी तडतडली की त्यात मिरची लसूण पेस्ट, कढीलिंब पाने घाला व चांगले परतवा.नंतर त्यात हळद,धनजिरे पूड व दाण्याचे वाटण घालून मीठ व पाणी घालून मंद आचेवर शिजू द्या.आमटी चांगली उकळी आल्यावर कोथिंबीर घाला.बाजरीच्या भाकरीसोबत खायला द्या गरमागरम वाटाण्याच्या दाण्याची आमटी.
वाढप: ही आमटी दोन ते तीन जणांना पुरेल.
मीनाक्षी काटकर
दारव्हा यवतमाळ
=======
0
4
8
2
8
4



