Breaking
ई-पेपरचारोळीविदर्भसाहित्यगंध

गुरूवारीय ‘चित्र चारोळी काव्यस्पर्धेतील रचना

मुख्य संपादक राहुल पाटील

0 4 8 2 9 4

*📗संकलन, गुरूवारीय ‘चित्र चारोळी काव्यस्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘गुरूवारीय चित्र चारोळी’ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट पंधरा🎗🎗🎗*

*🌤️विषय : आठवणीतला..!🌤️*
*🔹गुरूवार : १० / ०७ /२०२५*🔹
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*📗कृपया विजेत्यांनी साप्ताहिक साहित्यगंध १७७ साठी साहित्य पाठवून उपकृत करावे*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*आठवणीतला..!*

आठवणीतला पाऊस
झाला होता तो सर्वदूर
जिकडे तिकडे पाणीच
नद्या नाल्या आला पूर

*बी एस गायकवाड*
*पालम परभणी*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌨️💦🌨️♾️♾️♾️♾️
*आठवणीतला..!!*

पाऊस वारा गावाकडल्या आठवणीतला
तुडूंब भरलेल्या नदीवरल्या बांधाचा
शेतात शिरून पीक वाहून गेलेल्या पिकाचा
छतातून गाळणाऱ्या घरातल्या पावसाचा

*सौ. सुरेखा रावसाहेब चित्ते कांबळे*
*श्रीवर्धन जि. रायगड*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️🌨️💦🌨️♾️♾️♾️♾️
*आठवणीतला..!!*

तो आठवणीतला पाऊस
मज हवाहवासा वाटतो
होऊनी चिंब ताजे करावे
सजवून मनात गाली हसतो

*पु. ना. कोटरंगे*
*ता. सावली, जि. चंद्रपूर*
*©सदस्य – मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌨️💦🌨️♾️♾️♾️♾️
*आठवणीतला*

जीव मुठीत घेऊन
जात होतो आम्ही
गर्द आठवणीतला
तो पुल डोळ्यापुढे येई

*सौ.कुसुमलता दिलीप वाकडे नागपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️🌨️💦🌨️♾️♾️♾️♾️
*आठवणीतला*

बालपणीचा काळ सुखाचा
मागितले ते आई द्यायच्या
कामही नाही चिंता नसायच्या
आठवणीतला काळ सुखाचा

*श्याम राठोड,कारंजा लाड जिल्हा वाशिम*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌨️💦🌨️♾️♾️♾️♾️
*आठवणीतला..!!*

पावसाळा तो आठवणीतला..!!
मनात आजही रेंगाळतोयं
विस्कटलेल्या या आयुष्याला
मी नव्या उमेदीने जोडतोयं..!!

*सौ वनिता गभणे आसगाव भंडारा*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌨️💦🌨️♾️♾️♾️♾️
*आठवणीतला*

मुसळधार त्या पावसाने
कळस गाठला नाशाचा
आठवणीतला तो पाऊस
थरकाप उडवतो मनाचा

*श्रीमती सुलोचना लडवे*
*अमरावती*
*©सदस्या,मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌨️💦🌨️♾️♾️♾️♾️
*आठवणीतला..!*

दोन गावाला जोडतो
पूल आठवणीतला,
अजूनही दुरावस्थेत
माणूस खेड्यातला.

*मायादेवी गायकवाड ठोकळ*
*मानवत परभणी*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌨️💦🌨️♾️♾️♾️♾️
*आठवणीतला*

आठवणीतला पाऊस
जलधारांचा हैदोस
लाकडी पुलाचा नास
आठवणीत आहे खास ॥

*श्रीमती नीला पाटणकर,शिकागो*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌨️💦🌨️♾️♾️♾️♾️
*आठवणीतला*

डगमगत्या पावलांनी
सांकव ओलांडतांना
आजही आठवतो तो
आठवणीतला पाऊस

*कंचना मंडपे नागपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌨️💦🌨️♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपली छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*आठवणीतला*

आठवणीतला तो पाऊस
काया तुझी चिंब भिजलेली
ओलेते ते सौदर्य पाहून
मधुबालाची आठवण झाली.

*प्रवीण हरकारे*
*ता. नगर जि. अहिल्यानगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌨️💦🌨️♾️♾️♾️♾️
*आठवणीतला…..!!*

आला संतत धार पाऊस,
नदी नाल्यांना आला पूर
वाटली चिंता बळीराजास,
आठवणीतला पावसाचा दिवस//

*उर्मिला राऊत*
*फ्रेंड्स कॉलनी नागपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌨️💦🌨️♾️♾️♾️♾️
*आठवणीतला*

आठवणीतला तो पाऊस
दोघेही सोबत भिजलेलो
पुलावरील तो मोहक क्षण
अजूनही मी थिजलेलो

*सौ गौरी संतोष नेर्लेकर*
*ता. नेवासा जि. अहिल्यानगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌨️💦🌨️♾️♾️♾️♾️
*आठवणीतला*

आठवणीतला तो पाऊस
साठवणीतला तो पुर
वाहत असलेला तो
सांकव लांब दूर

*साजेश मगरे*
*ता. पूर्णा जि.परभणी*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌨️💦🌨️♾️♾️♾️♾️
*आठवणीतला*

तग धरून उभा होता आठवणीतला पूल
जलमय करून गेला होता मुसळधार पाऊस
ओल्या लाकडांनी विझवली होती चूल
प्रतीक्षेत तुझ्या ती बदलत होती कूस

*अश्विनी आनंदराव जगदाळे*
*बीड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌨️💦🌨️♾️♾️♾️♾️
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*💐सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार चित्र चारोळी समूह*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे