कवितानागपूरमहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध
आव्हान; सुधाकर भुरके
0
4
8
2
9
3
आव्हान
कधी मागे हटणार नाही,
वादळां घाबरणार नाही…
निधड्या छातीवर पेलण्या,
आव्हान पेलणार ही काही…१
आले कितिक गेले कितिक,
बघितले ऐसे रस्तोरस्ती…
अजूनही दम खम आहे,
तयार आहे, खेळाया कुस्ती…२
पेलले कैक, झेलले कैक,
अहंकारी येथे महारथी…
दावून दिली, त्यांना तयांची,
अंगी रूढली,कपटी वृत्ती,…३
आश्वासने ही,मारक असे,
सामोरे जाणे, निर्धोक नसे…
न जुमानता, निर्भिड वार,
विनाकारणे, उगाच ठसे…४
येतील कैक जातील कैक,
जाऊ सामोरे,तयां निश्चित…
‘सुधाकरा’ रे,सांभाळतांना,
दूर सारला, द्वेष उचित …५
सुधाकर भगवानजी भुरके
आर्य नगर नागपूर
=========
0
4
8
2
9
3



