Breaking
कोकणक्रिडा व मनोरंजनपरीक्षण लेखपश्चिम महाराष्ट्रपुणेमहाराष्ट्रमुंबई

लय भारी प्रॉडक्शन’ प्रस्तुत भयपट शॉर्टफिल्म ‘शापित ग्रंथ’ प्रेक्षकांच्या भेटीस

वसुधा नाईक, प्रतिनिधी पुणे

0 6 3 3 1 8

‘लय भारी प्रॉडक्शन’ प्रस्तुत भयपट शॉर्टफिल्म ‘शापित ग्रंथ’ प्रेक्षकांच्या भेटीस

वसुधा नाईक, प्रतिनिधी पुणे

बिनधास्त न्यूज नेटवर्क

पुणे: कोकण निसर्ग सौंदर्य आणि जंगल यांचा वापर करून शुटिंग झालेला भयपट रात्री मुंबईत रिलीज झाला. ग्रामीण भागातील लोककथांचा वारसा जपलेले रज्जाक शेख यांची यात प्रमुख भूमिका असून त्यांनी त्या भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.

मुंबईच्या लय भारी प्रॉडक्शन प्रस्तुत भयपट शॉर्टफिल्म ‘शापित ग्रंथ’ यात लेखिका व कथा सौ. प्रांजली काळबेंडे, दिग्दर्शक, निर्माता, संवादलेखन व पटकथा श्री. प्रमोद न. सूर्यवंशी, सहदिग्दर्शक श्री. संतोष रामचंद्र जाधव, सहनिर्माता श्री. हरिशचंद्र दळवी , मुख्य कलाकार श्री. रज्जाक शेख, सौ. स्मितादेशमुख, श्री. योगेश हरणे, उपासना किरपण, बालकलाकार कु. समीक्षा सागर नाईक, कु. आर्या शिव कोरे, सहकलाकार सौ. रेखा चंद्रकांत हरियाण, श्री. शिव कोरे, श्रीराम घडे, सौ. वंदना नागणे, श्री. संतोष जाधव, सौ. वसुधा नाईक, श्री. उल्हास किरपण, कला दिग्दर्शक सौ. रेखा चंद्रकांत हरियाण, श्री. प्रमोद पाताडे, सिनेमॅटोग्राफी निखिल हातणकर, श्री. योगेश हरणे, मेकअप सौ. रेखा चंद्रकांत हरियाण, कॉस्च्युम डिझाइन लय भारी टीमने केले असून लघुपटाला खूप प्रतिसाद मिळत आहे.

रज्जाक शेख यांच्या मते, ‘शापित ग्रंथ’ हा एक थरारक आणि अविस्मरणीय अनुभव होता. ‘शापित ग्रंथ’ ही हॉरर शॉर्ट फिल्म रिलीज झाली आणि सर्वांच्या कामगिरीचा अभिमान वाटला. भीतीची अतिशय प्रभावी मांडणी, उत्कंठावर्धक प्रसंग आणि उत्कृष्ट दर्जाचे सादरीकरण यामुळे हा लघुपट मनाला भिडतो.

या भयपटातील प्रत्येक कलाकाराने आपल्या भूमिकेला न्याय देण्यासाठी घेतलेली मेहनत, आपलेपणा आणि समर्पण खरोखरच कौतुकास्पद आहे. पडद्यावर दिसणाऱ्या प्रत्येक प्रसंगामागे अनेक तासांची मेहनत आणि जिद्द आहे, हे यातून जाणवते.

त्याचबरोबर या लघुपटासाठी त्यांनी आपला अमूल्य वेळ दिला, आपले घर उपलब्ध करून दिले आणि संपूर्ण टीमला मनापासून सहकार्य केले, त्या प्रत्येक व्यक्तीचे मनःपूर्वक आभार आणि कौतुक.

‘शापित ग्रंथ’ हा केवळ एक हॉरर शॉर्ट फिल्म नसून, अनेकांच्या मेहनतीतून साकारलेला एक अविस्मरणीय अनुभव आहे.

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 3 3 1 8

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे