0
4
8
2
9
0
पाहिले मी
काळीज तोडताना काळास पाहिले मी
श्वासास सोडताना बाळास पाहिले मी…!!
जोडून हात देवाला किती धावा केला
पाषाण काळजाच्या देवास पाहिले मी…!!
हारात झाकलेले बासिंग बांधलेले
अंतास बालकाच्या लग्नास पाहिले मी…!!
डोळ्यात आसवांचा पूर दाटून आला
जाळात लाडक्याच्या नाळास पाहिले मी…!!
जाळून राख केली आप्त स्वकियांनी
राखेत शोधणाऱ्या मनास पाहिले मी…!!
कोंडून दुःख सारे केले विधी कर्म
चोचीत कावळ्यांच्या पिंडास पाहिले मी…!!
राजश्री मिसाळ ढाकणे बीड
0
4
8
2
9
0



