Breaking
अहमदनगरई-पेपरनागपूरपरीक्षण लेखपश्चिम महाराष्ट्रबीडमराठवाडामहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

आपण आई वडीलांसाठी ‘आधार कार्ड’ का बनू नये?

डॉ ज्ञानेश्वर माशाळकर

0 4 8 2 8 6

आपण आई वडीलांसाठी ‘आधार कार्ड’ का बनू नये?

आई वडील आपल्यासाठी ‘एटीएम कार्ड’ बनतात. आपण त्यांच्यासाठी ‘आधार कार्ड’ का बनू नये.? संस्कारांचा शिकवणीला कोठेही जायची गरज नसते ते प्रत्येकाच्या घरात आई नावाचं विद्यापीठ असतं. मुलगा जेव्हा बापाची जागा घेतो, तेव्हा बाप रिटायर्ड होतो. पण आई मरेपर्यंत कधीच रिटायर्ड होत नाही. माझे वडील माझ्यासाठी अंधारातून जाताना मशाल होते. तर आई संकट काळी ढाल होती. म्हणून आई वडील श्रेष्ठ होते. प्रत्येकाच्या आयुष्यातील
एक हळवं पात्रं…

बाबा…
दूर कुठेतरी एकटाच उभा मात्र
आई सगळ्यांना कळते हो
बाप मात्र कळत नसतो
कळतं नाही बाप का नेहमीच
दुर्लक्षित असतो

प्रेम सगळेच करतात हो वडिलांवर
पण आईचं पुढे असते
बाप कष्ट करत असतो बाहेर
आणि आई घरात सगळ्यांना सोबत दिसते
तिच्यासोबत गप्पा मारतील
तिच्यासोबत ताटात जेवतील
बाप मात्र जवळ नसतो
जबाबदारीच्या बटव्यात
असाह्य वेदना गोळा करत असतो.

नोकरी करत असतानाच साहेबांचे
कितीतरी अपशब्दांचे व्रण
बापाच्या अंगावर असतात
कुणालाच सांगत नाही
आतल्याआत जळत असतो
पण त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव
कुणालाही दिसत नाही

बाप स्वतःसाठी कधी जगलाय का ?
आयुष्यभर त्याची मरमर असते लेकरासाठी
घडीभर विश्रांतीही नसते
काहीही झालं तरी बाप
वेदना दुःख सारं काही मनात ठेवून
कष्टाच्या वाटेवर धावत असतो
त्याच्या कष्टाचं समाधान
लेकरांच्या चेहऱ्यावर बघतो

बाप आहे ना म्हणून आपण असतो
तेव्हा बापाला ना केव्हातरी
कधीतरी एकदा तरी
प्रेमाने मिठीत घ्यायचं असतं
डोळे भरून बघायचं असतं
क्षणभर पाहिलं ना तर
त्याचा सारा थकवा निघून जातो
बाप पुन्हा कुटुंबासाठी
नव्याने आयुष्य जगतो

अरे दिसली नाही की आई कुठे गेली
सगळेच विचारतात
बाबा नाही दिसल्यावर कोण विचारतो
आईच्या अवतीभोवती घोळत राहतात
बाप बिचारा दुरून गंमत पहातो
आई म्हटल्यावर सतर्क होतात
बाप म्हटल्यावर मान वर होत नाही
घरात असूनही बापाजवळ कोणी जात नाही.

खरचं बाप कळायला
बाप काही एव्हढा सोपा नसतो
बाप, बाप असतो म्हणून तो
डोळ्यातून अश्रू येवू देत नसतो
अवघड असतं त्याचं जगणं
जगणं सोपं नसतं
बाप समजून घ्यायला
बाप होणं गरजेचं असतं काय……?

डॉ ज्ञानेश्वर माशाळकर
ता. उमरगा जिल्हा धाराशिव.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 6

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे