कवीवर्य बी.एस. गायकवाड ‘आदर्श शिक्षक’ पुरस्काराने सन्मानित
कवीवर्य बी.एस. गायकवाड ‘आदर्श शिक्षक’ पुरस्काराने सन्मानित
परभणी: परभणी: कास्ट्राईब शिक्षक संघटना महाराष्ट्र रजिस्टर नं 5701संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा व शिक्षण परिषद , शिवाजी लॉ कॉलेज परिसर. परभणी येथे रविवार दिनांक 29 सप्टेंबर 2024 पार पडला. सदर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून मा. डॉ. राहुल पाटील आमदार परभणी, कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.बी.डी धुरंधर, कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते मा. श्री नितीन चंदनशिवे प्रसिद्ध कवी सांगली, उपशिक्षणाधिकारी मा.शौकत पठाण, माजी उपसंचालक मा.सुधीर बानाटे, कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे कार्याध्यक्ष मा.गणेश मडावी, वरिष्ठ उपाध्यक्ष सुमित भुईगड, मुख्य संघटक मा. राजाराम इंदवे, अतिरिक्त सरचिटणीस अशोक गोडबोले, कास्ट्राईब शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्यचे सरचिटणीस मा. सतीशजी कांबळे, वरिष्ठ उपाध्यक्ष विजयकुमार जाधव, मुख्य संघटन सचिव परशराम गोंडाणे, राज्य प्रसिद्धी प्रमुख राहुल पाटील, डॉ सुभाष गायकवाड आदी मान्यवर पदाधिकारी सर्व जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष, महासंघाचे पदाधिकारी यांचे उपस्थितीत भव्य दिव्य स्वरूपात पार पडला यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमात परभणी जिल्ह्यातील एकूण २४ आदरणीय गुरुजनांचा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा जोतिराव फुले आदर्श पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
भगवान श्रावण गायकवाड, प्रा. शि. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पेठपिंपळगाव तालुका पालम जिल्हा परिषद यांना दिनांक 29.9.2024. रोजी परभणी येथील राज्यस्तरीय शिक्षण परिषद व वार्षिक सर्वसाधारण सभेत कास्ट्राईब शिक्षक संघटनेतर्फे “क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार “देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करून सन्मानीत करण्यात आले. त्याप्रसंगी सहकुटुंब सहपरिवार सत्कार करण्यात आला.



