Breaking
अलिबागई-पेपरकविताकोकणमहाराष्ट्रमुंबईसाहित्यगंध

आरसा बोलला माझ्याशी

पांडुरंग एकनाथ घोलप

0 4 8 2 9 3

आरसा बोलला माझ्याशी

आरसा बोलला माझ्याशी
तू आहे तसाच दिसणार
किती वेळा बारकाईने
न्याहाळून स्वतःस पाहणार?

सत्य लपेना माझ्यापासून
कितीही केलास आटापिटा
दिसतोस रूबाबदार जरी
मला ना फायदा ना तोटा

चेहर्‍यावरच्या रेषा तुझ्या
गुज मनीचे हे खोलतात
अंतरंगातील भाव सारे
डोळे तुझेच रे बोलतात

खऱ्या खोट्याचा हिशोब
मी प्रामाणिकपणे करतो
तुझे व्यक्तिमत्त्व तुलाच
जसे आहे तसे दाखवतो

लबाडी चालत नाही मला
काच आहे माझी निर्मळ
फुलासमान निष्कलंक मी
जरी नसेल सुगंध दरवळ

मी आरसा तुझ्या मनाचा
देतो साक्ष तुला स्वत्वाची
करून देतो जाणीव तुला
तुझ्या खऱ्या अस्तित्वाची

सांगेन तुला एकच पामरा
सत्कर्म सदा करीत रहा
खुलून दिसेल व्यक्तिमत्त्व तुझे
मग आरशात डोकावून पहा

पांडुरंग एकनाथ घोलप
ता.जुन्नर, जि.पुणे
==============

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे