Breaking
अहमदनगरई-पेपरकविताविदर्भसाहित्यगंध

मनधरणी

बी.आर.पतंगे जि.अहिल्यानगर

0 4 8 2 9 0

मनधरणी

काम पडले तुझे
म्हणून मनवितोस मला
इतर वेळेस मात्र अबोला नेहमी
नको करुस मनधरणी!!

नाही केली कधी
सणवाराला हौस मौज
न आणली साधी साडी
नको करुस मनधरणी!!

पडले घरातच खितपत
न नेले तीर्थक्षेत्री कधी
घरातच तुळजापूर अन वणी
नको करुस मनधरणी!!

माळलास का कधी
गजरा कुंतलात माझ्या
त्यागीली मी वेणीफणी
नको करुस मनधरणी!!

स्त्रियांना सोस दागिन्यांचा
न कर्णफुले न बुगडी
सजविली जशी लंकेची पार्वती
नको करुस मनधरणी!!

बी.आर.पतंगे
जि.अहिल्यानगर
==========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे