0
4
8
2
9
3
वेड्या मना
वेड्या मना… सांग ना
असा कसा रे वेगवान तू
क्षणात इथेच जवळ तर
क्षणात दूर देशीचा प्रवासी तू..
वेड्या मना…
तुझं आणि बुद्धीच
फारस पटतांना दिसत नाही
तुला जे आवडते ते बुद्धीला पटत नाही….
वेड्या मना…म्हणतात सारे
तुझं वागणं प्रेम पसारा,
फक्त भावभावनांचा फुलोरा
बुद्धीने वागणे जगण्यातला आकृतीबंध खरा..
वेड्या मना..
मन बुद्धीने करावी का तीच- तीच तडजोड
तोच – तोच हिशोब तीच आकडेमोड
तेच नियम त्याच चालीरीती
जगण्यातल्या नियमांची कायम भीती…
वेड्या मना..आज जगते आनंदे
करून स्वतःला तुझ्याच स्वाधीन
तुझ्याच तरंगावर होऊन स्वार
जगते स्वच्छंदे मस्तमौला होऊन पार…
सुरेखा कोरे
जिल्हा नागपूर
0
4
8
2
9
3



