0
4
8
2
8
6
नंदलाला
श्रावण अष्टमीला
पाळणा हलवूया
सानुला नंदलाला
डोळे भरून पाहुया
आरास पानाफुलांची
सजावट कल्पनेची
पर्वणीच आनंदाची
नंदलाला आल्याची
जागरण रात्रीचे
भजन पुजनाने
किर्तन काल्याचे
शेवट गवळणीने
आमंत्रण आप्तेष्टांना
महाप्रसाद ठरला
आवडते सर्वांना
कोहळा भाजीला
निर्माल्य गोळा करू
विसर्जन घरीच करू
प्रदुषण होणार नाही
सगळे विचार करू
ज्योती चारभे
ता.जिल्हा वर्धा
0
4
8
2
8
6



