0
4
8
2
9
0
पावसाच्या सरी
रिमझिम पडे
पाऊसाच्या सरी
पाहुनी काळे ढग
मयुर नृत्य करी.
नदी नाले सारे
तुडुंब भरून वाहती
पशुपक्षी अन् वेली
ओल्या थेंबात भिजती.
भुईच्या कुशीतून
नवा अंकूर जन्मतो
येता वाऱ्याची झुलूक
मनी आनंदून जातो.
वृक्षवेली साऱ्या कशा
बहरून बघा येती
डोंगरदऱ्या मधूनी
मधुबोल कानी पडती.
सप्तरंगी दिसे
इंद्रधनुष्य भारी
हिरव्या रंगी शोभे
धरती माता सारी.
दीपककुमार सरदार
ता. लोणार जिल्हा बुलढाणा
========
0
4
8
2
9
0



