
0
5
3
6
4
3
जनगणना
दर दहा वर्षान येतो
जनगणना कराचा सण
शासकीय अध्यादेश काढी
कामाचा घेऊ नका ताण ||
लोककल्याणकारी भारत देश
पिंजून काढुया घटक राज्य
साक्षर किती निरक्षर किती ?
महत्वपूर्ण विषय अविभाज्य |
संभाव्य याद्या अंतिम करा
अहवाल सादर करा शासनाला
या प्रणालीत गुंतले नोकरदार
अंदाजे लगावू नये टोला ||
खेडोपाडी वाड्या वस्त्या
घरोघरी जाऊन नोंद घेतोझ
वैयक्तिक कौटुंबिक शैक्षणिक
माहिती नमुना विहित करतो ||
लोकजागर कराचा घेत वसा
पवन हिरीहिरीने होई सहभागी
उत्कृष्टता कार्याचा उमटत ठसा
निपुण पैलु उलगडते कर्मागी ||
पवन सु. किन्हेकर
बोरगाव, जि.वर्धा
==========
0
5
3
6
4
3



