डाॅ.मधुसूदन घाणेकर यांचा ‘सबकुछ मधुसूदन’ हर्षोल्हासात
वसुधा नाईक, प्रतिनिधी पुणे
डाॅ.मधुसूदन घाणेकर यांचा ‘सबकुछ मधुसूदन’ हर्षोल्हासात
83,000 वा प्रयोग कोकणात उत्साहात
वसुधा नाईक, प्रतिनिधी पुणे
पुणे: 22ऑगस्ट 2025: आंतरराष्ट्रीय कीर्तिचे एकपात्री कलाकार, गायक, शीळवादक, अभिनेते सबकुछ डाॅ. मधुसूदन घाणेकर यांच्या विश्वविक्रमी ‘सबकुछ.मधुसूदन ‘ ह्या एकपात्री कार्यक्रमाचा 83000 वा प्रयोग आजरा येथील पेरणोली शाळेत नुकताच गाजला. डाॅ.मधुसूदन घाणेकर यांच्या दैदीप्यमान यशाबद्दल युवा क्रांति पोलिस मित्र संघटनेच्या महिला प्रदेश अध्यक्ष तसेच वसुधा फौंडेशन संस्थेच्या संस्थापक-अध्यक्ष वसुधा नाईक यानी डाॅ.घाणेकर यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.
डाॅ.मधुसूदन घाणेकर हे युवा क्रांति पोलिस मित्र संघटनेचे प्रदेश सल्लागारही आहेत.पे रणोली शाळेत झालेल्या कार्यक्रमात डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी सहीवरुन सही सही स्वभाव, शीळवादन , मिमिक्री , विनोदी किस्से, तसेच खास बालांसाठी गाणारा मुलगा, बोलके प्राणी , बोलके पक्षी, हसण्यारडण्याचे प्रकार अशा बहुरंगी बहुढंगी कार्यक्रमातून सर्व उपस्थितांची मने जिंकून घेतली.
डाॅ.घाणेकर हस-या व्यक्तींना हाहाहा sss लाफ इंटरनॅशनल ॲवाॅर्डस् प्रदान केले. गोड बोलणा-या बालांना मिठू मिठू पोपट ॲवाॅर्डस् प्रदान केले. डाॅ.मधुसूदन घाणेकर यांच्या सदर सबकुछ.मधुसूदनच्या 83,000 व्या एकपात्री प्रयोगाबद्दल आघाडीच्या कवयित्री अनुष्का गोवेकर आणि ज्येष्ठ पत्रकार रणजीत कालेकर यांच्या शुभहस्ते डाॅ.घाणेकर यांचा जाहिर सत्कार करण्यात आला.
समारोपात युनिव्हर्सल गोल्डन क्रिएशन संस्थेतर्फे डाॅ.मधुसूदन घाणेकर यांच्या शुभहस्ते अनुष्का गोवेकर यांना , सामाजिक -शैक्षणिक तसेच काव्य क्षेत्रातील मौलिक योगदानासाठी 2025चा युनिव्हर्सल गोल्डन क्रिएशन ॲवाॅर्ड प्रदान करण्यात आला. डाॅ.मधुसूदन घाणेकर संपादित विश्वविक्रमी डहाळी विशेषांकही मान्यवरांच्या शुभहस्ते प्रकाशित करण्यात आला. सदर कार्यक्रमास केन्द्रप्रमुख रावसाहेब देसाई , मुख्याध्यापक एकनाथ पाटील आदि मान्यवर उपस्थित होते. आजरा गावात डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी विश्वजोडो अभियानासोबत जिथे रसिक तिथे ‘ सबकुछ.मधुसूदन ‘ एकपात्री कार्यक्रमही केला.



