0
4
8
2
9
7
आठवण
खूप येते ओ तुमची
आठवण.…!
किती ते करावी
साठवण….!
मन आल भरून तेव्हा
ओघळतात अश्रू धारा
येते ओ तुमची आठवण
किती करावी साठवण.!!
कंठ येतो दाटून
मन येत भरून
दाबून ठेवला हुंदका ,
किती जरी आवरेना
डोळ्यातील अश्रू सावरेना
येते ओ तुमची आठवण
किती ते करावी साठवण
नसत ओ सोप तुमच्या
विणा जगण..!
कधी कधी पटत नाही
स्वःताच वागण..!
किती ते समजवाव मनाला
आठवण काढतो ,क्षणा क्षणाला
क्षणा क्षणाला ….!
श्रीमती कल्पना हरी सुरवसे
ता उमरगा जिल्हा धाराशिव.
0
4
8
2
9
7



