
0
6
3
3
3
6
आजीचा चष्मा
एकदा गंमतच झाली
आजी चष्मा विसरली
तिला वाटलं तो
चिंगीच घेऊन गेली
आजीनं मग
मलाच धारेवर धरलं
ओरडून ओरडून सारं
घर डोक्यावर घेतलं
एवढ्यात लक्ष गेलं
आजीच्या डोक्यावर
खुदकन हसू आलं
माझ्या ओठावर
आजी म्हणाली, चिंगे SS
हसायला काय झालं
चष्म्यावाचून माझं
सारं काम अडलं
मी लहान म्हणून
सगळेच ओरडतात माझ्यावर
चष्मा तर आहे
तुझ्याच डोक्यावर
आजी म्हणाली-
उगीचच रागावली चिंगीला
चष्मा माझ्या डोक्याला
मीच विसरभोळी मुलखाची
‘चिंगी’ माझी गुणाची
भुमेश्वरी सातपुते- खोंडे
ता.उमरेड,जि. नागपूर
0
6
3
3
3
6



