Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजनपरीक्षण लेखपश्चिम महाराष्ट्रपुणेसाहित्यगंध

उत्साहासाठी ‘आळस’ झटकायला हवा

वसुधा वैभव नाईक

0 4 8 2 9 4

उत्साहासाठी ‘आळस’ झटकायला हवा

वसुधा वैभव नाईक
धनकवडी,जि.पुणे

मुल जन्माला आल्यानंतर साधारणत: सहा सात महिन्यात रांगायला शिकतं. वर्षभरात चालायला लागतं. हळूहळू वरण, भात, भाजी, पोळी खायला सुरुवात करतं. तुम्ही म्हणाल आळसाशी असा काय संबंध. हो तस बघायला गेलं तर, आळसाशी संबंध आहे तसं बघायला गेलं तर अजिबात नाही. हे लहान मूल जन्माला आल्यानंतर उलथपालथ व्हायला लागतं. त्याच्या मर्जीप्रमाणे ते होत असतं. आपण त्याला हालचाल करण्यासाठी मदत करत असतो. पण बरीच बाळ अशी आळशीच असतात. काही बाळ चपळ असतात पटकन आपली रिएक्शन ओळखून आपल्याशी रिऍक्ट होत असतात. त्याप्रमाणे कृती करत असतात.

आता जरा मोठ्या मुलाकडे आपण जाऊया. ही मोठी मुलं आहेत ना आपल्या मनाप्रमाणे करत असतात. आई बाबा कितीही रागावले तरी त्याचा त्यांच्या मनावर काही परिणाम होत नाही. काही मुलं आईने सांगितलेल पटकन ऐकतात तर काही मुलं आळशी असतात. सकाळी शाळेत जायचं आहे अशा वेळेला आई खूप हाका मारते पण मुल आळशी असल्याने लवकर उठत नाही. मग शाळेला जायची खूप घाई होते. त्याविरुद्ध एखाद मुल आहे ना ते आईचं पटकन ऐकतं आणि अंघोळ करून छान तयार होतो शाळेत जाण्यासाठी. शिक्षकांनी सांगितलेल्या अभ्यासाचा कंटाळा, आईने सांगितलेला कामाचा कंटाळा, कंटाळा म्हणजे काय आळसच ना! तर असा हा आळसाचा दिवसेंदिवस मानवी शरीरावर परिणाम होत जातो. माणूस मग आळशी होतो. त्याला कामाचा उत्साह राहत नाही.

मुलगा कॉलेजला गेल्यानंतर एखादी संकल्पना तो आपल्या वडिलांपुढे मांडतो. त्याला एखादा बिजनेस सुरू करायचा असतो. अभ्यासाचा जरा कंटाळा आलेला असतो. तर अशा वेळेला आई वडील त्याच्या मनाप्रमाणे कृती करतात. एक छोटासा बिजनेस त्याला घालून देतात. पण मूळचा त्याचा स्वभाव आळशी असल्याने तो नीट अभ्यासाही करू शकत नाही. आणि धड आपल्या बिजनेस कडे लक्ष देऊ शकत नाही. अशा वेळी आई वडिलांच्या मनाची स्थिती खूप वाईट असते. तर मुलांनो आपल्या आई वडिलांच्या मतांचा आदर करा. अंगातला आळस झटका. अभ्यास करून छान मार्क मिळवा. आणि छान उच्च पदस्थ नोकरी करा. जर बिझनेस मध्ये तुम्हाला छान पुढे जायचं असेल तर बिझनेस हा देखील अभ्यासपूर्वकच करावा लागतो. हेही लक्षात ठेवा. “आळसे कार्यभाग नासतो” अशी एक म्हण आहे. तर या म्हणीचा विचार करा आणि अंगातला आळस झटकून टाकून कामाला लागा.

आपल्या मोठा माणसांचे सुद्धा असेच आहे.आळशीपणामुळे झोप उशीर पर्यंत घ्यायची. मग व्यायामाची वेळ निघून जाते. दिवसभर नोकरीचे व्याप आहेतच. बिझनेसचे व्याप आहेतच. मग मी व्यायाम कधी, कसा करू? असा प्रश्न ते मनालाच विचारतात. आपल्या गृहिणी आहेत त्यांनी जर का म्हटलं की मला कंटाळा आलाय घरातल्या कामांचा, स्वयंपाकाचा, मुलांचे डबे तयार करण्याचा तर काय होईल हो! सर्व ठप्प होईल घरातलं! पण ह्या गृहिणी अजिबात कंटाळा न करता आळस न करता दररोजचा दैनंदिन व्यवहार घरातला खूप छान संभाळत असतात. तर आता मी थांबते आळस या विषयावर खूप काही बोलता येते पण मी आता इथे थांबते आणि आपली रजा घेते. थांबला तो संपला, झटकून टाक जीवा आळशीपणा मनाचा.

वसुधा वैभव नाईक
धनकवडी,जि.पुणे

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे