0
4
8
2
9
3
मनधरणी
किती केली मी मनधरणी
नको होऊस रे व्यसनाधीन
ऐकले नाही तू माझे काही
रोज करतोस नाटक नविन
सायंकाळ होताच क्षणी
पिऊन करतोस धिंगाणा
घाबरतात रे मुलं तुला
शब्द तुझे घाणेरडे नाना
वाढत चालली घरात टंचाई
खाणेपिणे,शिक्षणखर्चाची
नको करू घराचा सत्यानाश
दारूपायी बदनामी घराची
सोड आता दारूचा नाद
वारंवार विनविते तुला
बनवू घराला नंदनवन
आत्मसुखाचा बांधू झुला
करू नकोस मनमानी
करते तुजला विनवणी
ऐक रे तू मनधरणी
फुटू दे काळजाला पाणी
श्रीमती सुलोचना लडवे
अमरावती
0
4
8
2
9
3



