नासाच्या अंतराळवीराने शेअर केला चंद्राचा फोटो
पॅसिफिक महासागराच्या वरून 'असा' दिसतो चांदोबा
नासाच्या अंतराळवीराने शेअर केला चंद्राचा फोटो
पॅसिफिक महासागराच्या वरून ‘असा’ दिसतो चांदोबा
अमेरिका: यूएस स्पेस एजन्सीचे सोशल मीडिया हँडलवर अवकाश प्रेमींसाठी एक खजिना शेअर केला आहे. दरम्यान, नासाचे अंतराळवीर मॅथ्यू डॉमिनिक, जे जवळजवळ चार महिने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर वास्तव्य करत आहेत, त्यांनी अलीकडेच पॅसिफिक महासागराच्या वरून चंद्राचा एक खास फोटो कॅप्चर केला आहे.
नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन (NASA) अनेकदा आपल्या पृथ्वीची आश्चर्यकारक छायाचित्रे कॅप्चर करतात. जे पाहिल्यानंतर अवकाश प्रेमी मंत्रमुग्ध होतात. या फोटोत तुम्ही प्रशांत महासागरावरून चांदोबा कसा दिसतो ते पाहू शकता. ‘प्रशांत महासागरावर चंद्र मावळत आहे. हवाई जवळ उष्णकटिबंधीय वादळ होन शूट करण्यासाठी कपोलामध्ये गेलो. परंतु, आम्ही वादळ पार करत असताना चंद्र मावळू लागला होता,’ असा डॉमिनिकने फोटोला कॅप्शन देताना म्हटलं आहे. सध्या व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये ढग आणि पृथ्वीच्या वातावरणाचा निळा रंग दिसत आहे.



