0
4
8
2
9
3
अस्तित्वासाठी
नाही समजत शब्दांविना
कुणाच्या मनाची कथा,
आपल्या अस्तित्वासाठी
धडपडणाऱ्यांची व्यथा..!!१!!
संकटांवर मात करूनी
तुला आहे उभे रहायचे,
अस्तित्वासाठी तुलाच
मानवा आहे लढायचे…!!२!!
निसर्गाची केलीस हानी
वारेमाप वृक्ष तोडूनी,
प्रदूषणाची सीमा झाली
जीव गेले होरपळूनी…!!३!!
किती तापमान वाढले
निसर्गही झाला लहरी,
किती पिकांच्या जाती
नष्ट होण्याच्या मार्गावरी…!!४!!
जलवायूमाती प्रदूषण
राक्षस घालतो थैमान,
तुझ्यापुढे असे मानवा
आता हेच खरे आव्हान…!!५!!
वृंदा (चित्रा) करमरकर
जिल्हा सांगली
=========
0
4
8
2
9
3



