0
4
8
3
0
0
स्पर्श विश्वासाचा
बाळ….
तू मुलगा असू दे मुलगी
एक हिताची गोष्ट ऐक…
ही दुनिया आहे माया पुरी
सगळीच माणसे नसतात
बघ या दुनियेत खरीखुरी
नातीगोती शेजारी पाजारी
सगळेच असतात भवती…
प्रेम, आपुलकी, जिव्हाळा
देती सारी तुम्हा भरभरूनी
पण एखादा असतो खडा
नि विश्वासाला जातो तडा
पारखून घे विखारी नजर
अवांच्छित नकोसा स्पर्श
कधी आपला कधी परका
नसतो इथे वासनेला भेद
याचाच वाटतो मनाला खेद
म्हणून प्रत्येक वेळी राहा सजग
आणि ओळखून घे….
आहे ना हा स्पर्श विश्वासाचा…!
वैशाली अंड्रस्कर,चंद्रपूर
0
4
8
3
0
0



