ई-पेपरकवितामराठवाडामहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध
रमणीय बालपण
0
4
8
2
9
7
रमणीय बालपण
रम्य ते बालपण
चहा सोबत पोळी
लय भारी लागायची
चाराण्याची संत्रा गोळी
भंगारावर भेटायची
बर्फाची पेप्सी
तोंडास पाणी आणायची
ती गव्हाची लाप्सी
रेडिओवरिल आवाज
छान कानात घुमायचा
चिमणीचा दिवा देखील
मंद प्रकाश द्यायचा
मजा वाटायची खूप
चोरायला शिक्यातलं लोणी
उड्या मारायचो भेटल्यावर
पंचवीस पैस्याची नाणी
ऐटीत मिरवायचो मस्त
बोटात टाकून मुरकुलं
दगडानेच वाजवायचो
फटाक्याची रोलं
पाठीवर फाटकं दप्तर टाकून
शाळेत जायचो पळत
चोर पोलीस खेळायचो
मिळण त्या वेळत
इंदुमती कदम
गंगाखेड,परभणी
==========
0
4
8
2
9
7



