Breaking
कविताछत्रपती संभाजी नगरनागपूरमहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

संतुष्टता विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर

0 4 8 2 9 3

संतुष्टता

उघड डोळे बघ नीट
नसे कुणी सर्व सुखी
तू मान थोडी संतुष्टता
नको होवू मित्रा दुःखी.. //

माझे दुःख खूप मोठे
हाच तुझा गैरसमज
तू कुणाहून तरी सुखी
कधी येईल ही उमज.. //

कुणी अंध कुणी अधू
इथे कुणी लुळे पांगळे
सुदृढ तुझे शरीर असे
हेच किती आहे चांगले.. //

जेथे हाव भौतिकतेची
तेथे हरवते मनःशांती
व्यर्थ उद्याच्या चिंतेत
सुकते अनमोल कांती…//

नाही त्याची खंत नको
आहे त्यातच समाधान
परिवर्तन नक्कीच होते
असू द्यावे याचेही भान.. //

  • विष्णू संकपाळ बजाजनगर
    छ. संभाजीनगर
    ======
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे