Breaking
ई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजननागपूरविदर्भसंपादकीयसाहित्यगंध

बुधवारीय ‘काव्यरत्न’ स्पर्धेतील रचना

मुख्य संपादक:राहुल पाटील

0 4 8 2 8 6

*✏संकलन, बुधवारीय ‘काव्यरत्न’ स्पर्धा*
➖➖➖➖➿????➿➖➖➖➖
*‼मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘बुधवारीय काव्यरत्न’ कविता स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट काव्यरचना*‼
➖➖➖➖➿????➿➖➖➖➖
*????मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿????➿➖➖➖➖
*????????????सर्वोत्कृष्ट दहा????????????*

*????विषय : अभिजात मराठी आम्ही????*
*????बुधवार : ०६ / नोव्हेंबर /२०२४*????
➖➖➖➖????????????➖➖➖➖
*अभिजात मराठी आम्ही*

अभिजात मराठी आम्ही
मराठीच आमचा बाणा
लाख वादळे झेलूनही
सदा ताठ पाठीचा कणा

अमृतातेही पैजा जिंके
संत ज्ञानेश्वर स्वये वदले
मराठीची गौरव गाथा
अनेक महंतही कथिले

मराठीच शान आमची
झाला अभूतपूर्व उद्धार
अभिजात दर्जा लेवूनी
झाला यथोचित सत्कार

सालंकृत मराठी भाषा
साज अलौकिक ल्याली
कथा,कविता,कादंबरीत
अमोघ शब्दांत प्रसवली

सजली मराठी संतवाणी
अभंग,किर्तनी,भजनी
शोभली मराठी प्रांजळ
विचारवंताच्या सुवचनी

थाट असा मराठीचा
गातील शाहिरी पोवाडे
अभिजात दर्जा सन्मान
डंका वाजला चोहिकडे

अभिजात मराठी आम्ही
मायबोली मराठीचे उपकार
महाराष्ट्र ललाटीचा टिळा
करू मराठीचा जयजयकार

*श्री.पांडुरंग एकनाथ घोलप*
*मु.पो.रोहोकडी,*
*ता.जुन्नर,जि.पुणे*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????✍️????♾️♾️♾️♾️
*अभिजात मराठी आम्ही*

स्वर्गलोकाहून थोर असे ही
अमर गाथा माय मराठीची
प्रगाढ जीवन तत्त्वज्ञान
प्राचीन स्वयंभू साहित्याची‌.

संत ज्ञानदेवांची ब्रम्हविद्या
किर्ती भावार्थदीपिकेची
नामा तुकोबांची अभंगवाणी
श्रेष्ठ गौरवशाली इतिहासाची.

रामायण महाभारत बृहकथा
वसे जीवन समृद्ध विचार
तन्मयतेने हृदयाची हाक
मराठी मातृभाषा उदार.

चौसष्ट अभिजात कलांनी
नामांकित आलेख विदया
कित्येक वर्षांची स्वप्नपूर्ती
अभिजात दर्जा मिळाला सध्या.

नाना अलंकारिक साज
रस महासागर शब्दांचा
सप्तसुरातून शब्द गाज
होई भूपाळी ते भैरवीचा.

अस्सल लावण्यखणी माझी
भाषा मराठी अभिमानाची
शेकडो बोलीभाषेतून सजली
संस्कृती श्रीमंती मराठीची.

आत्मगौरवी भाषा मराठीने
भावनिक ऋणानुबंध जोडले
कविता ओवी कथा कादंबऱ्या
शिरपेची मानाचे तुरे खोवले.

ज्ञानसंपदा तेवत ठेवणारे
मराठी भाषेचे समृद्ध दालन
अभिजात मराठी आम्ही सर्व
करतो मराठीचे अमृत प्राशन.

*सौ.सुजाता सोनवणे*
*सिलवासा दादरा नगर हवेली.*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह.*
♾️♾️♾️♾️????✍️????♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपली छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰????➰➿➿➿➿
*अभिजात मराठी आंम्ही*

अनंत काळापासून होतो
अभिजात मराठी आंम्ही
आज केवळ त्यावर केले
येथे शिक्कामोर्तब तुम्ही.. //

मागून गेले संत ज्ञानदेव
विश्वशांतीचे पसायदान
अमृताहूनी गोड प्राकृत
गेले लिहून सुवर्ण पान.. //

शोधून पाहा मूळ गीतेचे
किती प्राचीन हा वारसा
इथे सर्वकालीन सर्वश्रेष्ठ
संत वांड्मयाचा आरसा.. //

निकष कितीही लावाल
मनी नव्हता संदेह कांही
निःसंदिग्ध भाषा मराठी
देई अभिजाततेची ग्वाही.. //

नामा, नाथा, तुकोबाराय
झाले या पालखीचे भोई
अटकेपार झेंडा रोविला
गाजावाजा भाषेचा होई…//

अपार झिजवून लेखण्या
निर्मिला साहित्य सागर
काय वर्णावा गाज जणू
अक्षय अमृताचीच घागर.. //

लिहितो, वाचतो, बोलतो
भाषा मराठी अभिमानाने
अभिजात मराठी आंम्ही
शिरपेचात तूरा सन्मानाने.. //

*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????✍️????♾️♾️♾️♾️
*अभिजात मराठी आम्ही*

अभिजात मराठी आम्ही
आम्हा मराठीचा अभिमान
मराठीने आमचा मानपान
मराठी भाषा वाढवी शान

मातृभाषेचे बोल शिकविते
बाळकडू बाळाला पाजून
अंगाई गीत गात जोजविते
ठसा मातृभाषेचा उमटून

मराठी आमची मायबोली
आस्था जागते मनामनात
ज्ञानामृत प्राशन करण्याला
ओढ लागे प्रत्येक हृदयात

जाज्वल इतिहास जागवी
लेखन शैलीतून पुराव्यानी
भाषांतरीत झाले साहित्य
निरनिराळ्या भाषा मधुनी

पोवाडे,भारुड, सुभाषिते
अभंगवाणी,संत वचनाची
कथा,कादंबरी,कवितांची
पुरावे अभिजात भाषेची

थोर महिमा हा मराठीचा
मिळाला अभिजात दर्जा
लाभे मराठी भाषिकांना
नव चैतन्य,नव्याने ऊर्जा

*बी एस गायकवाड*
*पालम,परभणी*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????✍️????♾️♾️♾️♾️
*अभिजात मराठी आम्ही*

महाराष्ट्रची आण बाण शान
मातृभाषा मराठी ती महान
किती गावे तिचे गुणगाण
जागृतीचे पेटविले तिने रान ॥

असो अभंग वा भारूडे
थाट लावणीचा वा पोवाडे
कधी गाते माय अंगाई
पूर्व परंपरेची ही पुण्याई ॥

अडीच हजार वर्षे प्राचीण
असे स्वयंभू अन् मूल्यवान
वृत अलंकाराचे सुशोभण
ल्याली बोली भाषांचे आभुषण ॥

नाना प्रयत्ने अन् सायास
मिळविला अभिजात दर्जा भाषेस
जगतो नवरस मराठीत आम्ही
पांघरतो अभिजात मराठी आम्ही ॥

रंजल्या गांजल्यांची दवा मराठी
भूत , वर्तमान , भविष्याचा दुवा मराठी
शब्दांमधला प्राणवायू मराठी
भावना प्रगटनाचा आत्मा मराठी ॥

बोलू मराठी लिहू मराठी
शिकू मराठी शिकवू मराठी
साहित्य चर्चाही मराठी
सण _ संगीत- लोककला जपू मराठी ॥

अभिजात मराठी आम्ही
संवर्धनाचा बांधूया चंग
आखून धोरणे प्रगतीची
यशाचा गाठूया उच्चांक ॥

*सौ. सरला टाले राळेगाव यवतमाळ*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????✍️????♾️♾️♾️♾️
*अभिजात मराठी आम्ही*

लिहून ठेवले इतिहासातून
आहोत आम्ही खूप प्राचीन
उसनी न घेतली आमची भाषा
दुसऱ्या साहित्यसमूहाकडून

मौल्यवान वारसा जपला
आमच्या भाषेतून
हवं तेवढं प्राचीन साहित्य
आमच्या भाषेतून

असेल आमचे विभिन्न प्रांत
असेल आमची विभिन्न भाषा
आम्हाला नाही कसलीच भ्रांत
मराठी आमची राष्ट्रभाषा

अभिजात दर्जा मिळावा
म्हणून धडपडलो आम्ही
सरकारने ही मान्य केले
अभिजात मराठी आम्ही

*श्री पोपट सुखदेव मस्के*
*भाळवणी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर*
*©मराठीचे शिलेदार समूह सदस्य*
♾️♾️♾️♾️????✍️????♾️♾️♾️♾️
*अभिजात मराठी आम्ही*

अक्षर अक्षर गुंफून छान
शब्दमाला ही सजली
शब्दमाला गुंफून बाई
वाक्य रचना बनली….

शब्दभांडार जमले खूप
मना देई हर्ष अन आनंद
कविता तयार झाली आता
बनू लागला मस्त अभंग…..

मराठी भाषेचे सौंदर्य
सजले कोंदणात आज
अलंकारिक या शब्दांचा
चढवला सुरेख, सुंदर साज…..

कर्मभाषा आपली मराठी
मातृभाषा मराठी महाराष्ट्राची
कर्मभूमी आपली आहे
राजभाषा आहे मानाची…

अभिजात मराठी आम्ही
भूमी आहे थोर शिवबांची
संतांची ही पुण्यभूमी आहे
जाणकार आहे सुसंस्कारांची…

भक्तीचे गायीले इथे गीत
या मराठी मायबोलीने
भाषेची आहे शान ही
जपला वारसा संस्कृतीने……

साधी सोपी झोकदार
मराठी भाषा फार लयदार
गुणगान गावे किती तिचे
इथला मानव इमानदार….

*वसुधा वैभव नाईक*
*धनकवडी जिल्हा पुणे*
*©सदस्या मराठ्याच्या शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????✍️????♾️♾️♾️♾️
*अभिजात मराठी आम्ही*

अभिजात मराठी आम्ही
मराठी आहे आमुची वाणी
आहे आमुचा मराठी बाणा
मराठी साठी धरतो वाणा॥१॥

सालंकृत नटलेली मराठी
आहे आमुच्या ती पाठी
अलंकारीत साहित्य गाठी
झाली ती अभिजात मराठी ॥२॥

नाही आम्हां शब्दाची वाण
झटतो साहित्य निर्मिती साठी
मनांत आहे माणूसकीची जाण
जतन करतो अभिजात मराठी ॥३॥

कुणीही आम्हांला काहीही म्हणा
मराठी आहे आमुचा कणा
वाकणार नाही,काढू आम्ही फणा
अभिजात भाषेत झाली गणना ॥४॥

अभिजात मराठी आम्ही
अभंग ओव्या ठेवू टिकवून
अमृताशी पैजा जिंकणारी
नवकोट मराठीला त्रिवार वंदन ॥५॥

*श्रीमती नीला पाटणकर,शिकागो*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????✍️????♾️♾️♾️♾️
*अभिजात मराठी आम्ही*

हजारो वर्षांचा इतिहास
पुरातन साहित्य महान
अभिजात मराठी आम्ही
मराठी आमूची आण

तिचे वंशज आम्ही
मराठी आण बाण शान
मराठी रसिकास मोहवते
आम्हा तिचा अभिमान

उंच शिखरावर पताका
नवनिर्मितीची खाण
वर्णन करण्या शब्द थिटे
संचारतो स्वाभिमान

मी मराठी मी मराठी
मराठी साहित्याला मान
बोलू मराठी लिहू मराठी
आम्हा ती जीव की प्राण

हजार संकटे झेलून
मिळवला थोर सन्मान
लवून नमन त्या मातेस
जीवन तिजसाठी गहाण

*शर्मिला देशमुख -घुमरे, बीड*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????✍️????♾️♾️♾️♾️
*अभिजात मराठी आम्ही*

अभिजात मराठी आम्ही
गर्वाने सांगतो छातीठोक
अनादी काळमहिमा तिचा
नाणं खणखणीत रोखठोक

ज्ञानोबा तुकोबाची बोली
परंपरा तिची ही अपरंपार
बोल कौतुकाचे मराठीचे
फडकला झेंडा अटकेपार

गोडी असे माय मराठीची
भूत वर्तमान नि भविष्यात
अलंकारिक शब्दबाणांनी
होईल परिवर्तन आयुष्यात

मूळ साहित्यपरंपरेचे
दडले मज मातृभाषेत
मिळते अवीट ही गोडी
रामायण महाभारतात

जपूया समृद्ध असा वारसा
करुया संवर्धन मायबोलीचे
हो अभिजात मराठी आम्ही
नाते अतूट जन्मोजन्मीचे

*श्री बळवंत शेषेराव डावकरे*
*मुखेड जिल्हा नांदेड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????✍️????♾️♾️♾️♾️

➖➖➖➖????????????➖➖➖➖

*????सर्व विजेत्यांचे अभिनंदन* ????
*सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*????

➖➖➖➖????????????➖➖➖➖
*????????संकलन / समूह प्रशासक????????*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖????????????➖➖➖➖
*????मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖????????????➖➖➖➖

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 6

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे