Breaking
ई-पेपरकवितामराठवाडासाहित्यगंध

सदगुरू उज्वलानंद महाराज

डॉ ज्ञानेश्वर माशाळकर

0 4 8 2 8 7

सदगुरू उज्वलानंद महाराज

मी म्हणालो बाबांना,
तुम्ही माझे आहात कोण ?
बाबा म्हणाले बाळा,
तू आणि मी नाही दोन.
मी म्हणालो जीवनाची,
वाट माझ्या असेल कशी ?
बाबा म्हणाले,भितोस कशाला,
मी आहे तुझ्या सोबत.

मी म्हणालो बाबांना,
सांगा तुम्ही कुठे असता ?
जाते माझी नजर जिथे,
तिथे तुम्हीच कसे दिसता ?
बाबा म्हणाले, मी वसतो,
भक्तांच्या हृदयापाशी,
कधीही रस्ता सोडू नकोस,
मी आहे तुझ्या सोबत.

मी म्हणालो, बाबांना माझा,
हात हाती घ्याल का ?
चुकलो मी जरी कधी,
साथ मला द्याल का ?
नामस्मरण करत राहा
मग चूक होईलच कशी ?
बाबा म्हणाले,चालत राहा,
मी आहे तुझ्यासोबत आहे.
कळली मला चूक माझी,
मी उगीच प्रश्न विचारलो,
या जीवनी, क्षणोक्षणी,
बाबा सामोरे दिसले,
मी तुझा, नी तू माझा,
बाबा मलाच सांगितले,
भितोस कशाला, क्षणोक्षणी
मी आहे तुझ्यासोबत.

डॉ ज्ञानेश्वर माशाळकर
ता उमरगा जिल्हा धाराशिव

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे