मराठीचे शिलेदाराप्रती ऋणभार
"सुखसरीने चिंब मी"; प्रतिमा नंदेश्वर

मराठीचे शिलेदाराप्रती ऋणभार
“सुखसरीने चिंब मी”; प्रतिमा नंदेश्वर
गुरूवारला ‘तुमचा फोटो पाठवा’ आ. राहुल सरांचा मॅसेज होता. मी इलेक्शन मिटींगमध्ये असल्याने उशीराने बघितला. परीक्षकांनी माझ्या रचनेची सर्वोत्कृष्ट म्हणून निवड करूनही माझ्या चुकीमुळे मी वंचित राहिले. काल रात्री पण तुमचा फोटो पाठवा आ. सरांचा मॅसेज तो पण मी सकाळी उशीराच बघितला मी फोटो पाठवला आणि डिलीट पण केला. मला वाटले आधीचा मॅसेज असेल क्षमस्व सर चुकलेच मी.. तरीही सरांनी माझ्या छायाचित्रातील आकर्षक पोस्टर त्रिवेणी समूहात टाकले.
बघून मनाला हर्ष झाला खुपच मी सुखावले ..मुख्य प्रशासक राहुल सरांचे व मुख्य परीक्षक टीमचे कसे आभार मानावे कळेना..सदैव शिलेदार समुहाच्या ऋणाईत, तुमच्या माय मराठीच्या पवित्र कार्याला शतशः नमन..!
आदरणीय राहुल सरांच्या हातून मराठी भाषेच्या संवर्धनासाठी चाललेली धडपड नवकवींना साहित्य क्षेत्रात आणून त्यांना घडविण्याची नेत्रदीपक कामगिरी कवींच्या जीवनात एक दिवस निश्चितच क्रांती घडवेल यात शंका नाही.. लेखणीच्या साहाय्याने शब्दगंध शिलेदार समूहात रोजच दरवळतो आहे. भाव भावना, विचार, सुख, दु:ख शिलेदार व्यासपीठावर हक्काने मांडता येतंय, आणि ही संधी हा साहित्य प्रवास आम्हाला आ. राहुल सरांमुळेच करता आला.
आम्हावरील प्रेम, स्नेह,आपुलकी, जिव्हाळा यावरून दिसून येतो.त्याच्या सहकारी प्रशासकीय वर्गाचे सुध्दा खुप खुप कौतुक करावेसे वाटते. कारण त्यांचाही या कार्यात सिंहाचा वाटा आहे.सर्वाच्या परीश्नमापुढे मी नतमस्तक.!!
काल देण्यात आलेल्या ‘नखरा नजरेचा’या विषयावरील त्रिवेणी माझी रचना परीक्षकांना भावली सर्वोत्कृष्ट म्हणून निवड केली. सुखसरीने चिंब मी झाले. सर्व रचनेतून आपल्या रचनेची निवड होणे म्हणजे सुखद धक्काच ना? मराठीचे शिलेदार समूहाचे आधारवड, कल्पवृक्ष, देवांश,कवी, लेखक, समिक्षक,आदर्श शिक्षक,काही दिवसानंतर नुकताच सुरू झालेला सर्व शिलेदारांना सुखावणारा आनंद देणारा साप्ताहिक साहित्यगंध अंकाचे मुख्य संपादक माय मराठी सक्षमीकरणाच्या श्रीमंतीसाठी अहोरात्र झटणारे आमचे लाडके मुख्य प्रशासक आ. राहुल सर मुख्य सचिव निवासी संपादक आ. पल्लवीताई,मुख्य कार्यकारी संपादक आदर्श शिक्षिका कवयित्री, समिक्षक, प्रशासक आ. सविताताई, मुख्य सहसंपादक आदर्श शिक्षिका, कवयित्री आ. वैशालीताई, सहसंपादक आ. स्वातीताई, त्रिवेणी समुहाच्या मुख्य मार्गदर्शक आ. वृंदाताई, आ. सुधाताई, आ.तारकाताई, शर्मिलाताई, आ. विष्णू दादा, आ. संग्राम दादा, आ. हंसराज दादा, आ.बन्सोड दादा सर्व प्रशासकीय टिमचे हृदयस्थ आभार व धन्यवाद. माझ्यावर शाब्दिक शुभेच्छांचा वर्षाव करून मला वेळोवेळी प्रेरणा देणारे समूहातील दादा ताईंचे मनपूर्वक धन्यवाद.
सौ.प्रतिमा नंदेश्वर चंद्रपूर
सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह



