Breaking
क्रिडा व मनोरंजनपरीक्षण लेखपश्चिम महाराष्ट्रपुणेसाहित्यगंध

किल्ले: कोरीगड

स्वाती मराडे-आटोळे इंदापूर, पुणे

0 4 8 2 9 0

किल्ले: कोरीगड

महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील लोणावळ्याच्या पूर्वेला साधारण २५ कि.मी अंतरावर असणारा हा किल्ला समुद्र सपाटीपासून सुमारे ३०५० फूट उंच आहे. या किल्ल्याला शहागड असेसुद्धा म्हटले जाते. गडावर जायला दोन वाटा आहेत, त्यातील पेठ शहापूरची वाट एकदम सोपी आणि छान आहे, तर आंबवडे या दुसऱ्या पायथ्याच्या गावातून जरा किचकट वाट आहे. गड ‘अॅम्बी व्हॅली:ने तीनही बाजूंनी वेढलेला आहे. शहापूर गावातून सोपी चढण चढल्यावर पायऱ्या सुरू होतात. अर्ध्यावर एक गुहा, छोटेखानी गणेश मंदिर आणि पाण्याचे टाके आहे. दरवाजा आणि तटबंदीचे बांधकाम उत्तम आहे.

पेठ-शहापूर गावातून कोराईगड एका भिंतीसारखा भासतो. गडमाथा म्हणजे एक भलेमोठे पठार आहे. गडाची तटबंदी साधारणतः दीड किलोमीटर लांबीची आहे. तटबंदीवरून संपूर्ण गडाला फेरी घालता येते. दक्षिणेकडे बुरुजांची चिलखती तटबंदी आहे. पेठ-शहापूरच्या वाटेने वर येताना मार्गात अनेक गुहा व पाण्याची टाके आणि श्री गणेशाची मूर्ती लागते. गणेश दरवाज्याने अर्थात पेठ शहापूरच्या वाटेने वर आल्यावर समोरच वाड्यांचे अवशेष आढळतात. समोरच पठारावर दुरवर कोराईदेवीचे मंदिर आहे.

मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे. मंदिरासमोरच एक दीपमाळ आहे. गडाची देवता कोराई प्रसन्नवदनी, चतुर्भुज व शस्त्रसज्ज आहे. ही देवीची मूर्ती दीड मीटर उंच आहे.
गडावरील एकूण सहा तोफ़ांपैकी सगळ्यात मोठी तोफ ‘लक्ष्मी’ मंदिराजवळ आहे. गडावर दोन मोठी तळी आहेत. गडाच्या पश्चिम कड्याच्या उत्तर भागात काही छोट्या गुहा आहेत. ह्यालाच गणेश टाके म्हणतात. तळ्यांच्या पुढे आणखी दोन गुहा आहेत. येथेच शंख-चक्र-गदा-पद्मधारी श्री विष्णूची मूर्ती आहे. गडावरून समोरच नागफणीचे टोक, तुंग, तिकोना, माथेरान, प्रबळगड, कर्नाळा आणि माणिकगड असा सर्व परिसर दिसतो. याशिवाय मुळशीचा जलाशयही दिसतो. लोणावळा येथून येथे जायला बस आहेत परंतु त्यांचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे स्वतःच्या वाहनाने प्रवास केल्यास उत्तम. पावसाळ्यात विलोभनीय नजारा पाहत ट्रेकसाठी हा एक उत्तम किल्ला आहे.

स्वाती मराडे-आटोळे
इंदापूर, पुणे
सहसंपादक, साप्ताहिक साहित्यगंध

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे