0
4
8
2
9
3
अंधारल्या वाटा
अंधारलेल्या वाटा अनेक
सापडेना ध्येय जीवनात
सुखदुःखाच्या या वाटेवर
एकलाच मी वनवासात
कातर वेळ मनाचा ठाव घेत
रात्र निराळी स्वप्नात गेली
उगवला दिवस सुंदर प्रकाशित
सूर्यकिरणे आनंदाने आली
मृगजळाच्या पाठी लागली
आयुष्य विस्कळीत झाले
सावरता दुःख कमी होते
कष्टातून मोती पिकविले
अंधारल्या वाटा जरी
प्रकाशमान हो तू कष्टाने
विकासाची कास धरून चाल
विजयश्री येईल तुझ्या हिमतीने
यशोदीप लागेल तुझ्या कार्याला
अपयशाने खचून जाऊ नकोस
लाख संकटे हुबी तुझ्या दाराशी
संघर्षाची वाट तुझाच प्रकाश
कुसुम पाटील
कसबा बावडा कोल्हापूर
=====
0
4
8
2
9
3



