Breaking
कवितानागपूरमराठवाडामहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

थेंब पहिला; विष्णू संकपाळ

0 4 8 2 9 0

थेंब पहिला

थेंब पहिला वहिला
जणू परिसाचा स्पर्श
सोनै व्हावे या देहाचे
मन मयूराला हर्ष.. //

थेंबा थेंबाची रे जादू
देही कस्तुरीचा गंध
मन होई रे बेकाबू.
सारा आसमंत धुंद… //

मिळे अमृताचे दान
दूर झाली मरगळ
भरे रोमात श्वासात
चैतन्याची. दरवळ.. //

ओढ म्हणू की हे वेड
गोडी तुलाही लागली
धार थेंबाची जाहली
माझी तहान भागली.. //

तुझे दृढ अलिंगन
बीज रूजे उदरात
युगा युगाचे मिलन
दिसा मासाने भरात.. //

बाप बळीराजा हौसी
सारे पुरवी डोहाळे
ध्यानी मनी जपे स्वप्नी
पाही सुखाचे सोहळे.. //

साज श्रावण सुखाचा
अंगोपांगी बहरला
लाज लाजूनी मी चूर
देह सारा मोहरला.. //

गर्द शृंगार हिरवा
शालू चोळी चूडा हाती
गीत मायबाप माझे
सुख समृद्धिचे गाती.. //

काळजाच्या काळजीने
मला जपे अहोरात
दृष्ट लागो ना सुखाला
जोडे देवाजीला हात… //

सुखरूप होवो मुक्ती
पोटी येवो हिरे मोती
बाप जगाचा पोशिंदा
त्याची भरावी रे पोती.. //

विष्णू संकपाळ
बजाजनगर छ. संभाजीनगर
============

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे