कवितानागपूरपश्चिम महाराष्ट्रमराठवाडामहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध
मनाचा कोरा कागद; कुसुम पाटील
0
4
8
2
8
6
मनाचा कोरा कागद
मनाचा कोरा कागद माझा
काही वेळा कोराच राहिला
निसर्गाने दिला आहे साज
सप्तरंगात सजवू जीवनमानाला
शब्द बहरली गुंफत गेली सुमने
भाव मनीचा सुगंध देऊ लागला
कवितेला आकार येऊ लागला
कोरा कागदच बोलू लागला
यमक अलंकाराची जोडी जमली
कागदावर उमटले शब्दांची माया
अबोल संवाद कागदावर झाला
शब्द भासतात चांदण्याची छाया
मनाचा कोरा कागद शब्दांनी भरा
आनंद काळाची सुख खुले
हरवूया त्या शब्दगंधात
गुंफून शब्दांची माळ फुले
मनाच्या कोपऱ्यातील शब्द
जेव्हा कागदावर विसावतात
उमटतो माणुसकीचा ठसा
शब्दा शब्दातून बहरतात
कुसुम पाटील
कसबा बावडा कोल्हापूर
=======
0
4
8
2
8
6



