0
4
8
3
0
1
हुडहुडी
गुलाबी थंडी पसरली
हुडहुडी भरली अंगात
जागोजागी शेकोट्या पेटल्यात
अन् गप्पा आल्यात रंगात
प्रत्येकाचे गरम कपडे
निघालेत कपाटातून बाहेर
स्वेटर रजई अन दुलई
गोधड्या दिसती घराघरात
ठेल्या ठेल्यावर पसरे
कढत चहाचा दरवळ
उष्ण वाफाळलेला
चहा प्रत्येक हातात
वातावरणात विखुरली
शुभ्र धुक्याची चादर
धुरकट माहोल रस्त्यात
घरात अन् शेतात
सांज होताच जाहलीत
दारे खिडक्या बंद
गाव अन् वाड्या वस्त्या
मंद प्रकाशझोतात
डाॅ. नझीर शेख राहाता
जि. अहिल्यानगर
0
4
8
3
0
1



