Breaking
कवितानागपूरपुणेमहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

जीवन सुंदर आहे; पांडुरंग घोलप

0 4 8 2 9 0

जीवन सुंदर आहे

जीवन सुंदर आहे
ध्यानी असू द्यावे
सुरेल जीवनगाणे
नित्य गात रहावे

जीवन एकदाच आहे
आनंदाने ते जगावे
कार्य करावे असे काही
जे किर्तीरूपे उरावे

जीवन सुखदुःखाची वीण
तोल ढळू न द्यावा
ओठी असावे हसू
दुःखाचाही उत्सव व्हावा

सदा रहावे मग्न
आवडीच्या कामात
फूट पडू न द्यावी
आपल्या नित्यनेमात

आरोग्य जपावे आपले
आहार साजेसा घ्यावा
सुदृढ शरीर हवे तर
व्यायाम गरजेचा हवा

हृदयी प्रेम वसावे
नाती असावी हक्काची
सुखदुःखात कामी यावे
माणसे जोडावी प्रेमाची

जीवन सुंदर आहे
जगण्याचा उत्सव करावा
आयुष्यवेल बहरण्याचा
ध्यास मनी धरावा

पांडुरंग एकनाथ घोलप
मु.पो.रोहोकडी,
ता.जुन्नर जि.पुणे

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे