Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजननांदेडमराठवाडा

कें.प्रा. शाळा नरसी येथे राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

जि प्रतिनिधी नांदेड

0 4 8 2 9 0

कें.प्रा. शाळा नरसी येथे राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

जिल्हा प्रतिनिधी, नांदेड

बिनधास्त न्यूज वृत्तसेवा

नांदेड/नरसी: (दि १२ जाने): स्वराज्य जननी राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त आज (दि १२) केंद्रीय प्राथमिक शाळा नरसी येथे जिजाऊ कन्या शाळेतील सहशिक्षिका सर्वश्री सौ पंचलिंग मॅडम,देवपूजे मॅडम, तोटावाड मॅडम, नरचीकर मॅडम यांच्या हस्ते आऊसाहेब जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

मुख्याध्यापक श्री नलबलवार सर यांच्या हस्ते स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शाळेतील अनेक विद्यार्थ्यीनीनी जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवन चरित्रावर आधारित आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी शाळेतील सहशिक्षक श्री बळवंत डावकरे यांनी “जिजाऊ हवी होती” ही कविता सादर करून आजच्या समाजात चाललेल्या विदारक परिस्थितीवर परखड भाष्य केले. यानंतर सहशिक्षक श्री सखाराम जांभळीकर यांनी जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या कार्याची माहिती उपस्थित विद्यार्थ्यांना दिली.या कार्यक्रमास शाळेतील शिक्षक श्री उल्ले सर, जाधव सर,जावेद सर यांनी परिश्रम घेतले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे