‘राहुल जाधवर’ यांना वाढदिवसाच्या शता:युषी शुभेच्छा…!!
प्रा. दत्तात्रय खुळे ता. मंठा, जि. जालना

‘राहुल जाधवर’ यांना वाढदिवसाच्या शता:युषी शुभेच्छा…!!
समाजकार्य ही केवळ जबाबदारी नसून, ती एक साधना आहे. ही साधना ज्या व्यक्तीने निष्ठा, प्रामाणिकपणा आणि ध्येयाने जोपासली आहे, अशा वंजारी सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय मा,राहुलजी जाधवर सर यांचा आजचा वाढदिवस हा समाजासाठी प्रेरणादायी दिवस आहे.
राहुलजी जाधवर सर हे एक कुशल संघटक, स्पष्ट वक्ते आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्व म्हणून समाजात ओळखले जातात. वंजारी सेवा संघाच्या माध्यमातून त्यांनी समाजाला एकत्र आणण्याचे, समाजातील तरुणांना दिशा देण्याचे आणि राष्ट्रीय स्तरावर समाजाची ओळख निर्माण करण्याचे महान कार्य केले आहे. त्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले आहे. समाजातील अडचणीत असलेल्या व्यक्तींना मदत करणे, गरजू विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे आणि सामाजिक उपक्रम राबवून समाजात सकारात्मक परिवर्तन घडवणे हे त्यांचे जीवनध्येय बनले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रम यशस्वीरीत्या पार पडले. समाजातील प्रत्येक घटकाला एकत्र बांधून प्रगतीच्या दिशेने वाटचाल करण्याचे त्यांचे स्वप्न आज अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरत आहे.
जाधवर यांचा साधा स्वभाव, मनमिळावू वृत्ती आणि समाजाबद्दल असलेली तळमळ यामुळे ते सर्वांच्या मनात आपुलकीचे स्थान निर्माण करू शकले आहेत. समाजातील प्रत्येकाला साथ देणारे, मार्गदर्शन करणारे आणि संकटसमयी धीर देणारे असे व्यक्तिमत्त्व म्हणजे राहुलजी जाधवर सर. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त ईश्वरचरणी हीच प्रार्थना की त्यांना उदंड व निरोगी आयुष्य लाभो, त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली समाज अधिक प्रगत व संघटित होवो. आपल्या नेतृत्वाने समाजाला नवी दिशा मिळत राहो, आपले कार्य अखंड सुरू राहो, आणि आपल्या जीवनात आनंद, यश व समाधान नांदो. आदरणीय राहुलजी जाधवर सर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व उज्ज्वल भविष्यासाठी मंगलकामना!
साहेबांना समर्पित
समाज की राहों में जो दीप जलाते हैं,
अंधेरों में भी उम्मीदों के गीत सुनाते हैं।
ऐसे व्यक्तित्व को प्रणाम हमारा,
जो हर दिल में विश्वास जगाते हैं।
संघटन की शक्ति का जो स्वर बने,
समाज के सपनों का साकार बने,
हर युवा को जो दिशा दिखाते हैं,
वो सच्चे नेतृत्व के आधार बने।
आपका जीवन सदा सुगंधित रहे,
हर दिन नया उत्सव बनता रहे,
स्वस्थ रहें, दीर्घायु हों आप,
सफलता का सूरज चमकता रहे।
जन्मदिन पर ईश्वर से यही दुआ,
सम्मान और यश बढ़ता रहे सदा,
समाज सेवा का यह पावन सफर,
नई ऊँचाइयों तक जाता रहे सदा।
प्रा. दत्तात्रय खुळे
ता. मंठा, जि. जालना
युवा साहित्यिक
युवा प्रदेश सरचिटणीस,
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद
=========



