0
4
8
2
9
7
बहर
खचत नाहीत वृक्ष पानगळीने
खचू नये तसे माणसा संकटाने
निष्पर्ण वृक्षा पालवी नव्याने
जिवन जगावे पुन्हा आनंदाने
बहर नव्याने येई जेंव्हा जिवनी
आठव होई संघर्षमय कहाणी
रूप नवे,रंग नवे,भारी निसर्ग
भासे वसुंधरा अवतरला स्वर्ग
बहर येता सारं प्रफुल्लित होई
नवी दिशा, आशा उदयास येई
बहर आला झाडे वेली वृक्षाला
मनोमनी हर्ष होतो या मनाला
बहर यावा वाटे पुनश्च फिरुनी
होई आनंद आपुल्या जीवनी
बहर नवा आला खुलावे पुन्हा
गुणधर्म दाखवणे कर्तव्य पुन्हा
बी एस गायकवाड
पालम, परभणी
=====
0
4
8
2
9
7



