अलिबागेत १७ नोव्हेंबरला आगरी वधू-वर मेळावा
तुषार थळे, जिल्हा प्रतिनिधी
अलिबागेत १७ नोव्हेंबरला आगरी वधू-वर मेळावा
तुषार थळे, जिल्हा प्रतिनिधी
अलिबाग: आदर्श आगरी युवक मंडळ, मुंबई तर्फे १०१ व्या आगरी वधू-वर मेळाव्याचे रविवार, १७ नोव्हेंबर २०२४ रोजी आयोजन करण्यात आले आहे. सदर मेळावा कर्णिक हॉल, पंतनगर, चेंढरे – अलिबाग येथे सकाळी ९:३० ते दुपारी १२:३० च्या दरम्यान आयोजित करण्यात आला आहे.
आदर्श अग्रसेन वधू-वर परिचय केंद्राच्या आतापर्यंत अलिबाग, उरण, कोपरखैरणे, ठाणे, डोंबिवली, वडाळा, पुणे, विरार, भाईंदर, पालघर अशा १० शाखा कार्यरत आहेत. या सर्व शाखांमध्ये उत्तम प्रकारे वधू-वर नोंदणी होत आहे. तसेच ऑनलाईन पद्धतीनेसुध्दा नोंदणीचा पर्याय उपलब्ध आहे. रविवार, १७ नोव्हेंबर २०२४ रोजी होणारा १०१ वा वधू-वर मेळावा हा नावीन्यपूर्ण आणि नियोजनबध्द करण्याचा आयोजकांचा मानस आहे.
ह्या वधू वर मेळाव्यात वधू वरांना स्टेजवर जाण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे इच्छुक वधू वरांनी आणि पालकांनी ह्या गोष्टीचे स्वागत केले आहे. परंतु वधू वरांनी हॉलमध्ये उपस्थित राहणे हे गरजेचे आहे असे आयोजकांनी सांगितले आहे.
मेळाव्याच्या दिवशी हॉलच्या ठिकाणीही नवीन वधू-वर नोंदणी करण्यात येईल. नोंदणीकृत उमेदवारास वर्षभरात जेवढे वधू-वर मेळावे होतील तेथे मोफत प्रवेश तसेच मंडळाच्या कुठल्याही शाखेत वधू वर फाईल तपासता येईल. सदर मेळाव्यास विवाहोत्सुक वधू-वरांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळून कार्यक्रम यशस्वी होईल, अशी अपेक्षा आयोजकांतर्फे व्यक्त करण्यात येत आहे.



