0
4
8
2
9
4
मिसळीचे थालीपीठ
साहित्य: गहू एक किलो,दोन वाट्या ज्वारी,एक वाटी चनाडाळ,एक वाटी मूगडाळ,एक वाटी मटकी
वरील सर्व एकत्र दळून आणावे.
दोन टोमॅटो, दोन कांदे,आठ-दहा लसण पाकळ्या ,एक वाटी चिरलेला पालक,एक वाटी कोथिंबीर ,आठ-दहा हिरव्या मिरच्या,(यासर्व साहित्याची पेस्ट करून घ्या)मीठ,हळद,लाल तिखट,ओवा एक चमचा,तीळ अर्धी वाटी इत्यादी
कृती-वरील पेस्टमध्ये तिखट,मीठ,हळद,ओवा ,तीळ घाला.त्यात बसेल एवढे पीठ घालून मळा.लहान लहान थालीपीठ लाटून तेल लावून खमंग भाजा.दही किंवा लोणच्यासोबत खायला द्या.
मीनाक्षी काटकर
दारव्हा यवतमाळ
0
4
8
2
9
4



