0
4
8
2
8
4
बोलाची कढी
महापालिकांच्या निवडणुका
आल्या की म्हणता म्हणता
प्रचाराचा धुरळा उडाला
उत्साह शीगेला हो पुरता
भलीमोठी आश्वासने देती
कि तोंडाला पाने पुसती
जनता संभ्रमित जाहली
कळेना खरे कोण बोलती
वचन नामे बोलाची कढी
निकालानंतर कोलांटी उडी
फसवायची वेगळी नीति
उमेदवार मारतात दडी
लगबग पक्ष कार्यालयात
गर्दी हौशा नवशांची
मटण पार्ट्या, जेवणावळी
कुजबूज सुरु भेटवस्तूंची
निकाल लागेल लवकरच
खोट्याचे पोलच खुलेल
सच्चा नेताच बघा जिंकेल
निवडणुकीत बाजी मारेल
वृंदा(चित्रा)करमरकर
ता. जिल्हा सांगली
0
4
8
2
8
4



