0
4
8
2
9
7
अर्धचंद्र
चांदोबा चांदोबा
दिसतो किती छान
आकाशाच्या राजाचा
असे तुला मान
चांदण्यांच्या पंगतीत
मिळते तुला स्थान
पाहुनी रूप तुझे
हरपते माझे भान
कलेकलेने वाढते
चंद्रकला साजिरी
अर्धचंद्राकृती दिसे
नभात गोजिरी
पौर्णिमेला किती
सुंदर तू दिसतो
अमावस्येच्या रात्री
कुठे तू लपतो
मलाही खेळायला
चांदोमामा नेशील का ?
रात्रभर तुझ्यासवे
मला फिरवशील का?
प्रांजली जोशी,
विरार,जि.पालघर
=========
0
4
8
2
9
7



