0
4
8
2
9
0
ओझरतं
ओझरतं दिसता सूर्यबिंब
धरा मनोमन रे शहारली
उबदार स्पर्शाने रोमांचित
कळी अलगद रे बहरली
काळ्या ढगांच्या रे आडून
कुळवाळतो ओल्या बटांना
प्रेमबीज पेरतो धरांगणी
ओढ लावी सागरी लाटांना
ढगांशी होता हातमिळवणी
बेधुंद गातो लावणी मधुर
प्रेमानं धरेची करे शाकारणी
साकार करतो स्वप्नं अधुरं
ओझरतं सूर्यबिंब चकाकता
मनोमन हरखला रानवारा
तृप्त धरेची गंधाची उधळण
मोर नाचे फुलवून पिसारा
संग्राम कुमठेकर
अहमदपूर, जि.लातूर
=======
0
4
8
2
9
0



