Breaking
अलिबागआरोग्य व शिक्षणकोकणक्रिडा व मनोरंजनपश्चिम महाराष्ट्रपुणेमहाराष्ट्रमुंबई

हिंदी परीक्षेत बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवासचे सुयश

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

0 4 8 2 8 7

हिंदी परीक्षेत बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवासचे सुयश

परीक्षा महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा, पुणेच्या वतीने आयोजित

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

बिनधास्त न्यूज वृत्तसेवा

अलिबाग: (दि ३१): महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा, पुणे यांच्या मार्फत रविवार दि. २९ सप्टेंबर २०२४ रोजी घेण्यात आलेल्या हिंदी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे.

या परीक्षेत आवास सासवने धोकवडे रहिवासी हितवर्धक मंडळाच्या बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवासचे इ. ५ वी ते इ. ८ वी चे ५० विद्यार्थी बसले होते. ते सर्वजण उत्तीर्ण होऊन विद्यालयाचा निकाल १००% लागला आहे.

🔹परीक्षेत विद्यालयातून प्रथम व द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण होणारे विद्यार्थी पुढील प्रमाणे

*राष्ट्रभाषा बालबोधिनी परीक्षा इ. ५ वी-*

*प्रथम क्रमांक-* हर्ष जितेंद्र गोठणकर– १०० पैकी ८० गुण
*प्रथम क्रमांक-* नीर्वी सर्वदिप कोळी– १०० पैकी ८० गुण
*द्वितीय क्रमांक-* तनिष्का नितीन म्हात्रे –१०० पैकी ७८ गुण
*द्वितीय क्रमांक–* रक्षिता किशोर भगत– १०० पैकी ७८ गुण

*राष्ट्रभाषा प्राथमिक परीक्षा इ.६ वी –*

*प्रथम क्रमांक -* ओवी प्रेमनाथ थळे — १०० पैकी ७२ गुण
*द्वितीय क्रमांक -* गार्गी परेश पाटील १०० पैकी ७० गुण
*राष्ट्रभाषा प्रवेशिका परीक्षा इ. ७वी-*
*प्रथम क्रमांक-* दक्ष दत्तात्रेय घरत २०० पैकी १३० गुण
*द्वितीय क्रमांक -* सृष्टी आशिष म्हात्रे – २०० पैकी १२९ गुण
*राष्ट्रभाषा सुबोध परीक्षा इ.८ वी-*
*प्रथम क्रमांक–* समिक्षा गजानन पाटील – २०० पैकी १६८ गुण
*द्वितीय क्रमांक–* काव्या सुशांत भगत – २०० पैकी १६७ गुण

सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी पल्लवी पाटील मॕडम व दिव्या भगत मॕडम यांनी मार्गदर्शन केले. परीक्षा यशस्वीरित्या व पारदर्शकपणे घेतल्याबद्दल आणि केलेल्या सहकार्याबद्दल महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा, पुणे यांच्यातर्फे मुख्याध्यापक / प्राचार्य अनिल दारकुंडे सर, सहाय्यक शिक्षिकापल्लवी पाटील मॅडम व दिव्या भगत मॅडम यांना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. तसेच सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.

मा.मुख्याध्यापक / प्राचार्य अनिल दारकुंडे सर, सहाय्यक शिक्षिका पल्लवी पाटील मॕडम व दिव्या भगत मॕडम यांचे तसेच सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे ग्रुप – ग्रामपंचायत, आवास सरपंच अभिलाषा अभिजीत राणे, आ. सा. धो.रहिवासी हितवर्धक मंडळाचे अध्यक्ष रणजीत प्रभाकर राणे, संस्थेचे सर्व पदाधिकारी, सर्व सभासद, शालेय समितीचे सर्व पदाधिकारी व सर्व सभासद, तसेच मुख्याध्यापक / प्राचार्य अनिल दारकुंडे सर, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे