0
4
8
2
9
3
कमी पडलो तर
गेलो मी कंटाळून आता
हिच्या उधळ्या स्वभावाला
येता जाता शाॅपिंग करते
दुःख माझे सांगू कुणाला
बड्या बापाची पोर ही
भाळून तिच्या पैशाला
गळ्यात मी पडलो तिच्या
पश्चात्ताप होतो आता मला
दिसायला ती अशी तशी
रुबाबदार मी देखणा
वाईन ती पिते आनंदाने
सोबत लागतो चकणा
आवड तिजला साड्यांची
साडी एकदा नेसलेली
नाही परत नेसत ती
भरली कपाटे साड्यांनी
पदरात हो मुली तीन
त्याही तिच्या वळणावर
काळजी वाटे भविष्याची
मी जर कमी पडलो तर
प्रवीण हरकारे
जि.अहिल्यानगर
0
4
8
2
9
3



