0
4
8
2
9
0
पालवी फुटतांना
खचलेल्या दरडीतून
तग धरून टिकतांना,
पाहिले आहे वृक्षा मी
नव पालवी फुटतांना..!
आले वादळवारे जरी
त्यातूनही सावरतांना,
पाहिले आहे मी तया
ते नव्यानं उभारतांना..!
जीर्ण झाला वृक्ष तरी
देतो फळ फुल छाया,
टिकवून आहे तशीच
पशुपक्ष्यांवरती माया..!
मातीशी घट्ट पकडून
मुळे तोल सांभाळीत,
आधार देतात वृक्षास
त्यांचं कार्य निभवित..!
पालवी फुटतांना नवी
खुलतो अंगप्रत्यांगाने,
पाहता सहज त्याकडे
शिकवून जातो जगणे..!
कठीण काळात कधी
खचून नाहीच जायचं,
आहे अस्तित्व जोवर
नवचैतन्यानं फुलायचं..!
बी. एस. गायकवाड
पालम,परभणी
==========
0
4
8
2
9
0



