
0
6
3
4
0
6
निघाले बाप्पा
निघाले बाप्पा, डोळ्यांत दाटले पाणी,
निरोपाच्या क्षणी विरहाची कहाणी.
ढोल-ताशांचा नाद जरी अजूनही घुमतो,
तव अस्तित्वाचा प्रकाश हा झळकतो.
रिकाम्या मखरात विरह दाटून येतो
मनी भक्तीचा गंधची रे दरवळतो
स्वर आरतीचे अजून रेंगाळती दारी
मोदकांच्या नैवेद्यी तुझा गोडवा येतो
हात जोडुनी मन तुलाच हाक मारी
“लवकर ये रे बाप्पा” आस ही अंतरी
रक्त पुष्पांनी तुझीच सजली रे वाट
नयनी साठवली तुझीच मूर्ती गोजिरी
शिवगौरीचा सुत तू रे गणराया
चौदा विद्या, सर्व कलांचा अधिपती
तव कृपाकटाक्षे विघ्ने दूर पळती
साश्रू नयनांनी तुझीच भाव आरती
दश दिवसांचा सोहळा क्षणी सरला
मम मनाने तुझाच शोध रे मांडला
नयनांत अश्रू परि मुखी तुझेच नाम
तव अस्तित्वाचा मनी आनंद भरला
वृंदा (चित्रा) करमरकर
ता. जिल्हा सांगली
0
6
3
4
0
6



