0
4
8
2
9
0
श्रीगणपती
श्रीमहागणपती उत्सव साजरा घरोघरी
प्रतिष्ठादिनी झडल्या पाऊस सरी
ढोलताशांचे पडघम आले कानी
आनंद भावतरंग खुलले मनी
गणेशभक्त करती सहर्ष स्वागत
श्रीमंगलमूर्ती मोरया जयघोषात
जास्वंद दुर्वा पूजन साग्रसंगीत
वातावरण होईल शुध्द पवित्र
मयूरेश्वर सिध्दीविनायक बल्लाळेश्वर
वरदविनायक गिरिजात्मज विघ्नहर
श्रीविनायक अष्ट गणपती दर्शन
श्रीचिंतामणी करी चिंता दूर
लाडू मोदक प्रसाद खिरापदीचा
गाऊ या आरती गुंग होई मती
पठण करु सुरात अथर्वषीर्श
सुखकर्ता दुःखहर्ता आशीष देई
सुनीता पाटील
जिल्हा अहिल्यानगर
=========
0
4
8
2
9
0



