
0
6
3
4
0
1
गोत्यात वाहून गेले
केवळ प्रसिद्धीसाठी,जे मोहात वाहून गेले।
अन् दाने जसे बिचारे ,जात्यात वाहून गेले ।।
गोड गोड बोलणारे, स्वार्थात मग्न होते।
ते संपले अधर्मी, परलोकात वाहून गेले।।
सत्कर्मी जे न साधे ,माणसास जमत येथे।
ते लोक माणसांच्या ,काळजात वाहून गेले।।
गप्पा परमार्थाच्या, वागणे मात्र ढोंगी।
भोंदू संत अन् साधे गोत्यात वाहून गेले।।
भुकेल्यास अन्न नाही,तहान्यास पाणी नाही।
क्षणिक सुखाच्या मागे,ते गर्वात वाहून गेले।।
सत्यास चालणाऱ्या,लाभल्या जखमा येथे।
दुष्टांचे सोहळे अन् भोळे शोकात वाहून गेले।।
होईल का अशाने, कल्याण या जगाचे।
आश्वासने फुकाची,जे हवेत वाहून गेले।
गोवर्धन तेलंग
ता.पांढरकवडा.जि. यवतमाळ
0
6
3
4
0
1



