डॉ.भाविका दलदले यांनी केली साचलेल्या पाण्याची चौकशी
तालुका भिवापूर/मालेवाडा
रजत डेकाटे, प्रतिनिधी
नागपूर: भिवापूर पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या मालेवाडा गावातील ग्रामपंचायत आवारात असलेल्या उपकेंद्रासमोर पावसाचे पाणी साचले होते त्याची चौकशी करण्याकरिता डॉक्टर भाविका दलदले ह्या आल्या होत्या.
डॉक्टर दलदले यांच्याकडे धामणगाव येथील उपकेंद्राचा कारभार सुद्धा आहे. इतकेच नव्हे तर डॉक्टर दलदले यांच्याकडे मालेवाडा येथील उपकेंद्राचा अतिरिक्त कारभार देण्यात आला. मालेवाडा येथील ग्रामपंचायत परिसरात आरोग्य विभागाचा कारभार सुद्धा चालत असतो डॉक्टर भाविका दलदले यांनी म्हटले की पावसाच्या काळात ठिकठिकाणी भरपूर प्रमाणात पाणी साचलेले असते. त्यामुळे रोगराई पसरण्याची दाट शक्यता असते. धूर फवारणी पाणी शुद्धीकरण हे नेहमी करावे अशा सूचना डॉक्टर भाविका दलदले यांनी ग्रामपंचायत प्रशासनाला पत्राद्वारे विनंती केली आहे



