Breaking
ई-पेपरकविताछत्रपती संभाजी नगरनागपूरमराठवाडासाहित्यगंध

बहर

विष्णू संकपाळ बजाजनगर

0 4 8 2 9 3

बहर

सोसावा लागतो थोडासा
पानझडीचा शिशिर कहर
मागोमाग येतच असतो
नवपालवीचा वसंत बहर.. //

सत्व परीक्षा कठिण वेळी
मनोभूमीची असते तयारी
ही निसर्गाची तत्वप्रणाली
राखेतूनही घ्यावी उभारी.. //

प्रबळ करावे मनोबलास
नकोच रहावे म्लान वदनी
आघात झेलण्यास तत्पर
ढाळू नयेच आसवे नयनी.. //

मातीही देतेय अग्निदिव्य
तेव्हा पिकती मोती अपार
नियम मानवा हाच तुलाही
दुःखामागे येई सुख बहार.. //

घेते नियती झाडाझडती
याला समजावे कर्मभोग
असेल कांही संचित गाठी
येतो जुळूनी प्रारब्ध योग..//

विष्णू संकपाळ बजाजनगर
छ. संभाजीनगर
=========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे